पिंपल्स हे प्रामुख्याने हार्मोन्स आणि चेहऱ्याच्या त्वचेच्या आरोग्याशी संबंधित असलेला आजार आहे आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार हे खूप प्रभावी दिसून आले आहेत. हे पिंपल्स चेहऱ्यावर येण्यासाठी खालील गोष्टी प्रामुख्याने जबाबदार असतात.
१) रक्तदुष्टी - तेलकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थामधून होणारी
२) शरीरातील टाकाऊ घटक शरीरात साठणे
३) हॉर्मोन मध्ये असंतुलन
४) स्ट्रेस - टेन्शन
५) चेहऱ्याच्या त्वचेची योग्य काळजी न घेणं - सौंदर्य प्रसादनांचा अमाप वापर.
तुम्हाला जर पिंपल्स चा त्रास असेल तर खालील टिप्स नक्की तुम्हाला मदत करतील.
आहार (Diet)
गाजर , काकडी आणि हिरवागार भाज्या, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडेन्ट भरपूर असलेली फळे घ्या.
ओमेगा ३ फॅट भरपूर असणाऱ्या सूर्यफूल, भोपळा ,टरबूज या सारख्या बियांचा वापर करा.
मुबलक पाणी प्या. पुरेशी झोप घ्या.
हे नक्की टाळा -
तेलकट, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ ,तीव्र सूर्यप्रकाशात जाणे . वारंवार पिंपल्स ना स्पर्श करणे , मेक अप तसाच ठेऊन रात्री झोपणे.
त्वचेची काळजी घेताना या गोष्टीकडे लक्ष ठेवा.
दिवसातून ३ ते ४ वेळा चेहरा स्वच्छ धुवा.
हळद आणि चंदनाची लेप - कांतिवर्धनासाठी
नीम आणि चंदन याचा लेप - पिंपल्स ची सूज कमी करण्यासाठी रक्त शुद्धीसाठी.
हळद + लिंबाचा रस - चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी.
जायफळाचा लेप - पिंपल्स चे व्रण - डाग कमी करण्यासाठी
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी त्वचेवर थोडा लावून जळजळ होत नाही ते पहा.
आयुर्वेदिक औषधी -
वाळ्याचे सरबत - स्ट्रेस आणि पित्त कमी करण्यासाठी
आवळ्याच्या आहारात वापर - रक्त शुद्ध करून त्वचेची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी
शतावरी + अश्वगंधा +अशोक - हार्मोन्स ची पातळी नॉर्मल ठेवण्यासाठी.
गुडुची/ गुळवेल - रक्ताची शुद्धी करण्यास मदत करते
त्रिफळा चूर्ण - आतड्यांची स्वच्छता राखते
टीप: वर उल्लेख केलेली कोणतीही आयुर्वेदिक औषधी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.